प्रवेशोत्सव साजरा
कै सौ सुंदरबाई राठी मुलींची प्रशाला येथे दिनांक 15 जून 2026 रोजी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थिनींचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
सुरुवातीस विद्यार्थिनींचे मा . मुख्याध्यापिका बोळकवठेकर नीता यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले . मा. नगरसेविका अश्विनी कदम यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शालेय उपयोगी वस्तू तसेच फुगे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींच्या मनोरंजनासाठी त्यांच्या हातावर मेंदी काढली . त्यानंतर विद्यार्थिनींच्या मनोरंजनासाठी सिंड्रेला व आजीच्या गोष्टी हे चित्रपट व कार्टून्स दाखवण्यात आले.

प्रवेशोत्सव सेल्फी काढण्यात आल्या . प्राथमिक स्वरूपात प्रत्येक इयतेच्या 2 विद्यार्थिनींना नवीन पाठयपुस्तकांचा संच देण्यात आला . मुली खूप खूश झाल्या .