आंतरराष्ट्रीय योग दिन
पुणे सेवासदन संस्थेच्या कै. सौ. सुंदरबाई राठी प्रशालेत शनिवार दि. २० जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहाने साजरा करण्यात आला . याप्रसंगी योगप्रशिक्षक व Fitness trainer श्रीमती सुवर्णा परदेशी या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या . परदेशी मॅडम यांनी विद्यार्थिनींना योगासने , सूर्यनमस्कार आणि प्राणायाम याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजावून सांगितले व त्याचे प्रात्यक्षिकही मुलींकडून करवून घेतले . त्यासोबतच Zumba Dance चे session ही घेतले . विद्यार्थिनींना हे योग प्रात्यक्षिक खूप आवडले व दररोज योगविद्येचा सराव करण्याचा निर्धार मुलींनी व्यक्त केला .
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या कार्यक्रमासाठी पुणे सेवासदन संस्थेचे सरचिटणीस मा . पटवर्धन सर , सहाय्यक सरचिटणीस मा . शहाणे मॅडम , प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा . बोळकवठेकर मॅडम , पुणे मनपा नगरसेविका मा . कदम मॅडम इ. मान्यवर उपस्थित होते . सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी योग दिनाच्या प्रात्यक्षिकात सहभागी झाले . या कार्यक्रमाचे निवेदन शिक्षिका दीपाली बोरसे यांनी केले .
धन्यवाद !





