स्वाधार मीटिंग

स्वाधार या संस्थेतर्फे शाळेतील इयत्ता नववी मधील वीस आणि इयत्ता दहावी मधील वीस मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत केली जाते. या संस्थेचे कार्य संस्थेच्या नूतन मॅडम यांनी सांगितले. फॉर्म भरण्याचे मार्गदर्शन संस्थेच्या मेघना मॅडम यांनी केले.  फॉर्म भरताना आवश्यक नोंदी आणि लागणारी कागदपत्रे याचीही माहिती दिली. यावेळी पालकांच्या प्रश्नांना नूतन मॅडमने उत्तरे दिली. दहावीनंतरही पालक आणि विद्यार्थिनी यांनी जर संस्थेशी संपर्क केला तर त्यांना पुढेही सहकार्य करू असे आश्वासन नूतन मॅडमने दिले. यावेळी स्वादर संस्थेतर्फे पालक आणि विद्यार्थिनी यांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नीता बोळकवठेकर उपस्थित होत्या.

Scroll to Top