विज्ञान प्रदर्शन & स्नेहसंमेलन

पालवी नर्चरिंग माइंड्स अँड बियॉंड   या संस्थेच्या वतीने कै .ध.रा. पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळेत यावर्षी वाचन प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत संस्थेकडून विद्यार्थ्यांना द मॅजिक बुक बॉक्स ची 50 पुस्तकांची भेट मिळाली होती. वर्षभर विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचे वाचन केले.

विद्यार्थ्यांनी या पुस्तकांपैकी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर आधारित चित्रे काढली, मनोगते लिहिली आणि भाषणे सादर केली.
 
या तीनही स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना आज संस्थेच्या अध्यक्ष माननीय शोभा श्रीकांत मॅडम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके  व बक्षीसे देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षिका सौ. प्रिया निघोजकर यांनी केले.
Scroll to Top