शालेय विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक
प्रशालेत विद्यार्थिनी प्रतिनिधींची निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी अर्ज भरणे, प्रचार करणे, मतदान प्रक्रिया याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून त्यांची ओळख करून देण्यात आली. विद्यार्थिनींना लोकशाही प्रशासनाची ओळख व्हावी, प्रौढ मताधिकार व गुप्त मतदान पद्धतीचे महत्त्व समजावे, तसेच नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि निर्णयक्षमता विकसित व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम प्रशालेत दरवर्षी उत्साहाने राबविला जातो.
प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर विद्यार्थिनींचे शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, क्रीडामंत्री, सांस्कृतिक मंत्री, शिस्तमंत्री अशा विविध पदांची जबाबदारी विद्यार्थिनींना देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थिनींना नेतृत्व करण्याची आणि जबाबदारी पार पाडण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली.
शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी 8 ऑगस्ट 2026 रोजी संस्थेचे सरचिटणीस माननीय पटवर्धन सर आणि सहसरचिटणीस माननीय शहाणे मॅडम यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, शिस्त, सहकार्य आणि जबाबदारीची भावना विकसित होण्यास निश्चितच मदत झाली.


