मा श्रीमती रमाबाई रानडे यांच्या १६४ व्या जयंती निमित्त -
सोशिली निंदा जरी, गिरवित गेली अक्षरे
हृदयी तिच्या ज्ञानामृताचे, वाहती निर्मल झरे
शिक्षणावाचून ‘स्त्री’ची दुर्दशा होई जनी
जाणिले हे अंतरी अन् योजले काही मनी
शिक्षणाचे वस्त्र आणिक अक्षरे आभूषणे
स्वावलंबी जीवनाचे येई भाळी गोंदणे
ज्ञानमंदिर स्थापिले सेवाव्रता स्वीकारुनी
अर्थ दिधला जीवना, साऱ्या तमाला सारुनी
जे बंद दरवाजे खियांना ते तुम्ही केले खुले
आजची प्रत्येक तारा तळपते तुमच्यामुळे
कवयित्री – श्रीमती मृणालिनी कानिटकर जोशी
