एक गंमत, गणितातील.

▶️कोणतीही दोन अंकी संख्या घ्या. दोन्ही अंक वेगवेगळे हवेत बरं.
समजा आपण घेतले 48.
आता यातील अंकांच्या स्थानांची अदलाबदल करून मिळतील 84.
▶️ आता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा.
84 – 48 = 36

🟣 36 ही 9 च्या पाढ्यातील संख्या आहे हे आपण जाणतोच.

▶️ आता आणखी एक संख्या घेऊन हीच कृती करू.
समजा आता घेतले 13
अंकांचे स्थान बदलून होतील 31.
31 – 13 = 18.

🟣 पुन्हा एकदा 9 च्या पाढ्यातील संख्या मिळाली. ✌🏻✌🏻✌🏻

असे नेहमीच होते का? करून पहा. दोन अंकी संख्या घेऊन करा ही कृती. दोन अंक वेगवेगळे घ्यायला विसरू नका हं
ही गंमत शोधून काढली भारतातील तेही आपल्या महाराष्ट्रातील एका थोर गणित शिक्षकांनी. डहाणू येथे त्यांचा जन्म झाला, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर नाशिक येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे दत्तात्रय रामचंद्र कापरेकर
त्यांनी शोधलेला कापरेकर स्थिरांक याबाबत आपण ऐकले आहे. त्यांनी अजूनही नवनवीन गणितातील नाविन्यपूर्ण शोध लावले आहेत. जलद गतीने गणन करणारे मानवी यंत्र असा त्यांचा उल्लेख केला जातो. अंकमित्र या पदवीने त्यांचा गौरव केला गेला असे द. रा. कापरेकर.
आज त्यांची जन्मतारीख.
17 जानेवारी 1905 या दिवशी त्यांचा जन्म झाला.
17/5/1905 ते 4/7/1986 हा त्यांचा कार्यकाल होता.

हर्षद संख्या, दत्तात्रय संख्या, विजय संख्या, मर्कट संख्या आणि बर्‍याच काही संख्या, गणितातील काही short cuts इ. अनेक विषयांवर त्यांनी संशोधन केले होते. Indian mathematical society चे ते सन्माननीय सदस्य होते.
अशा या महान गणितज्ज्ञाला शतश: प्रणाम!

मनीषा पाठक
माजी विद्यार्थिनी, माजी शिक्षिका, कै सुंदरबाई राठी प्रशाला. 
 
Scroll to Top