दहावीच्या विद्यार्थिनींसाठी पालक सभा
गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दहावीच्या विद्यार्थिनींसाठी पालक सभा घेण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती बोळकवठेकर मॅडम यांनी पालकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींचे उपस्थितीचे प्रमाण वाढवण्याविषयी काही उपाय सुचवले. याचबरोबर विद्यार्थिनींचे विषयांमधील गुण वाढवण्यासाठी पालक व शिक्षक दोघांनी मिळून विद्यार्थिनींकडून अभ्यास करून घेण्याविषयीचे मार्ग सांगितले. विद्यार्थिनींचा सराव होण्यासाठी आवश्यकता असेल तर दर शनिवारी विद्यार्थिनींकडून सराव प्रश्न सोडून घेतले जातील याचेही आश्वासन दिले. पण विद्यार्थिनींची उपस्थिती शनिवारी कमी असते याविषयी मुख्याध्यापकांनी पालकांजवळ नाराजी व्यक्त केली.
प्रथम सत्र परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थिनींमध्ये झालेली प्रगती याविषयी पुन्हा चर्चा करण्यासाठी पालक सभा घेतली जाईल हे सांगितले.








