संवाद : शब्दांच्या पलीकडचा स्पर्श
आज एका मुक्या मुलाला त्याच्या आईशी बोलताना पाहिलं . हातवारे करून , देहबोलीच्या साहाय्याने तो आपले म्हणणे सांगत होता.ते दृश्य पाहून प्रथम त्याच्या मुकेपणाची कणव वाटली पण नंतर वाटलं आपण शब्दवंत तरी दरवेळी शब्दातून खरा संवाद साधू शकतो का? खूप वेळा व्यक्ति व्यक्तिंमधील गोठलेला संवाद हे स्पष्टपणे व्यक्त न करता येणारे मनाचे नाजूक दुखणेच असते नाही का?
संवाद म्हणजे नुसते संभाषण नसते .तशी शब्दांची देवघेव तर आपली सारखी चालूच असते पण मनातील हळुवार स्पंदने जाणून घेण्याची क्षमता जेंव्हा दोन व्यक्तींमधेअसते तेंव्हा संवाद घडतो
संवादात दोघींची व्यक्तिमत्वे तंतोतंत सारखी असावीत असं कांही नाही पण एकमेकींना पूरक असे काही दुवे मात्र स्वभावात असावे लागतात कोणतेही उत्कट नाते हे फुलासारखे असते संवाद हा त्या नात्याला तोलून धरणारा देठ असतो एकदा संवादाचा बुरूज ढासळला की नातेसंबंधाची पडझड चालू होते मग एरवी दोन मनांना जवळ आणणारे शब्द ओरखड्यासारखे मनात सलत राहतात बऱ्याचदा आपला अहंकार ही याला कारणीभूत असतो याउलट संवादाची नस सापडली की मनातले भाव
सहजपणे व्यक्त होऊ लागतात गीतेतल्या तत्वज्ञानाला जेंव्हा ज्ञानेश्वर कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील “ह्रदयसंवाद “म्हणतात तेंव्हा त्याला वेगळीच काव्यात्मकता प्राप्त होते
कुणाचा संवाद माणसांशी जुळतो ,कुणाचा चराचराशी तर कुणाचा परमेश्वराशी जुळतो मग नामदेवाचे मन पंढरीच्या विठोबाला आपले ह्रदगत सांगायला आतूर होते आश्रमकन्या शकुंतलेचे निसर्गाशी जुळलेले मन फुलं पाहताना मोहरून येते
कलावंतांना संवादाची तीव्र ओढ असते कधि त्यांना आपले भावजीवन रसिकांपर्यत पोचवायचं असतं तर कधि त्यांना निसर्गातल्या चैतन्याशी संवाद साधायचा असतो आपला संवाद अपूर्ण राहिल्याची खंत त्यांना अनेकदा बोचत राहते

संक्रांतीच्या निमित्ताने आपणही सगळ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न करू या का? तुम्हाला काय वाटतं?
प्रमिला महाजनी माजी शिक्षिका
सुंदरबाई राठी हायस्कूल (१९७४ ते २००४)
सुंदरबाई राठी हायस्कूल (१९७४ ते २००४)